
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी – नवनाथ यादव
भु म:- शहरात मी सावरकर, स्वातंत्र्य वीर सावरकरांचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जयघोषात सावरकर समर्थक भाजपा- शिवसेना कार्यकर्त्यानी जोरदार गौरव यात्रा काढली. यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. फेरी
कार्यकर्त्यानी व समर्थकांनी स्वातंत्र्यवीर वि. दा.सावराकरांच्या कार्याचा इतिहास सर्वसाधारण प्रत्येक नागरिकाला समजला पाहिजे. देशासाठी दिलेले योगदान माहीत झाले पाहिजे. या उदात्त हेतूने सावरकर गौरव यात्रा भूम शहराच्या नगर पालिका चौक, लक्ष्मी रोड मार्गने गोलाई चौक येथे नेवून तेथे समारोप केला.
सावरकरांच्या अपमानाची परतफेड जनता करेल असे वक्तव्य भाजपा तालुका अध्यक्ष महादेव वडेकर यांनी करून आपल्या भाषणात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.
कार्यक्रमाचे सावरकर गौरव यात्रेचे सूत्रसंचालन भाजपाचे शहर अध्यक्ष शंकर खामकर व गौरव यात्रेचे संयोजक संतोष सुपेकर यांनी केले. या गौरव यात्रेत जिल्हा सरचिटणीस आदम शेख, भाजपा जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर ता अध्यक्ष महादेव वडेकर, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, भाजप नेते अंगद मुरूमकर, शिवसेना नेते विशाल ढगे, समाधान सातव ता. सरचिटणीस संतोष सुपेकर मा. नगरसेवक रोहन जाधव ,शहर अध्यक्ष शंकर खामकर, शहर सरचिटणीस हेमंत देशमुख, अआज शहर अध्यक्ष प्रदीप साठे, सचिन बारगजे, चंद्रकांत भगत, ऍड श्री संजय शाळू, ता. उपाध्यक्ष बाबा वीर, अमोल बोराडे, ता. युवा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सरचिटणीस सचिन मस्के, ता. सरचिटणीस मुकुंद वाघमारे , महिला मोर्च्या ता. अध्यक्ष सौ. लताताई गोरे, ता. सोशल मीडिया शांतीराज बोराडे, संदीप महानवर, कृष्णा पांचगे, शंकर घुले , सुहास बुरटे, सिद्धार्थ जाधव, रमेश देशमाने, किरण कुलकर्णी, उदय कुलकर्णी, लक्ष्मण भोरे, भाजपा- शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.