
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व सुरेश पाटील हिलाल असुन आज दि. ९ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
सुरेश पाटील हिलाल यांचा जन्म लोहा खांबेगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील हे शेतकरी आहेत. सुरेश पाटील हिलाल यांचे शिक्षण लोहा येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात झाले .
घरी राजकीय पार्श्वभूमी नसताना ही सुरेश पाटील हिलाल राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले स्थान स्वतःच्या मेहनतीवर निर्माण केले आहे. विद्यार्थी दशेत असताना त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कला होती त्यांच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले , छत्रपती शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवाचा विचाराचा पगडा आहे त्यामुळे ते अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमीच आवाज उठवितात गोरगरिब, शेतकरी शेतमजूराचे प्रश्न सोडवितात गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांना सन २००० ते२०१५ या सलग तीन टर्म १५ वर्ष सरपंच केले . त्यांना सरपंच पदाच्या काळात जनतेने दिलेल्या संधींचे सोने केले. गावात अनेक शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत सिंचन विहीरी दिल्या . रोहयो अंतर्गत अनेक कामे मंजूर करून शेतमजुरांच्या हाताला काम दिले,गावात रस्ते,वीज, पाणीपुरवठा आदीची सोय केली .
तसेच त्यांनी गावच्या राजकारणानंतर सर्कल व तालुक्याच्या राजकारणात भरारी घेतली. पुढे चालून ते शिवसेने मध्ये सक्रीय झाले . शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला शिवसेनेच्या धोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या प्रमाणे त्यांनी आपले कार्य सुरू केले शिवसेनेच्या अनेक आंदोलनात कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यांची दखल पक्षाने घेऊन त्यांना पक्षाने २००५ ते २०१० या कालावधीत शिवसेनेचे पेनूर सर्कल म्हणून नेमणूक केली . तसेच त्यांचे कार्य बाहरत गेले पुढे २०१० ते २०१४ या कालावधीत ते शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य केले यांची दखल पक्षाने घेऊन त्यांच्यावर शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख म्हणून बढती दिली . शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून त्यांचे कार्य अतिशय उत्कृष्ट असुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेच्या लोहा तालुक्यात अनेक शाखा स्थापन केल्या. अनेक गरजू रुग्णांना दवाखान्यात नांदेडला दाखल करुन उपचारासाठी मदत केली. शिवसेना पक्षाचे अनेक उपक्रम राबविले, अनेक आंदोलने केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ व सच्चे मावळे राहिले .
पुढे राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या सोबत ४०आमदार १२ खासदार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यप्रमुख , तालुकाप्रमुख, नगरसेवक गेले पण सत्तेच्या मागे न लागता शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी इमान राखत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहत सुरेश पाटील हिलाल हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राहून ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुकाप्रमुख म्हणून लोहा तालुक्यात जोमाने कार्यरत आहेत .
आज दि. ९ एप्रिल रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या काळात ते लोहा पंचायत समितीचे सभापती होवो ईश्वर त्यांना दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.