दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची 7 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील नूतन कार्यकारणी संदर्भात चर्चा करून तालुका अध्यक्ष पदी दै देशोन्नती तालुका प्रतिनिधी शेख मुर्तुजा यांची निवड केली व पुढील कार्यकारणी जाहीर करण्यास संमती दिली यावरून 8 एप्रिल रोजी लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे डी एन कांबळे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार सुरेश महाबळे यांच्या उपस्थितीत पत्रकारांची बैठक घेण्यात आली नूतन कार्यकारणी संदर्भात चर्चा करण्यात येऊन तालुका अध्यक्ष पदी देशोन्नती तालुका प्रतिनिधी शेख मुर्तुजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून गोविद पाटील कदम सचिव प्रवीण महाबळे व कार्याध्यक्ष पदी फेरोज मणियार यांची निवड करण्यात आली
तालुका कार्यकारणी पुढीप प्रमाणे तालुका अध्यक्ष शेख मुर्तुजा तालुका उपाध्यक्ष गोविद पाटील पवार तालुका सचिव प्रवीण महाबळे तालुका कार्याध्यक्ष फेरोज मणियार कोषाध्यक्ष वीरभद्र एजगे उपाध्यक्ष गजानन मोरे ग्रामीण उपाध्यक्ष मारोती कांबळे सह कोषाध्यक्ष विश्वनाथ कांबळे सह सचिव बाळासाहेब कतुरे यांची तर सल्लागार म्हणून सुरेश जोंधळे डी एन कांबळे केशव पाटील पवार सुरेश महाबळे
कार्यकारणी सदस्य म्हणून जगदीश पाटील कदम पांडुरंग रहाटकर सिद्धार्थ महाबळे यांची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व कार्यकारणी चे पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले
लोहा तालुका कांग्रेस पक्षाकडून नूतन कार्यकरणीचा सत्कार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी देशोन्नती चे पत्रकार शेख मुर्तुजा यांची बिनविरोध निवड झाली याबद्द्ल कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार माजी नगरसेवक उत्तम महाबळे चंद्रकांत नळगे गोविद वड व्यंकट दांगटे पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब बुद्धे भगवान पाटील हुस्सेकर बळी पाटील दगडसागवीकर यांनी नूतन अध्यक्ष शेख मुर्तुजा यांचे स्वागत करून अभिनंदन केले