दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
गोणार:- पेठवडज सर्कल मधिल गोणार ता. कंधार जि. नांदेड येथे विश्वशांती बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला भिख्खू डाँ एम सत्यपाल महाथेरो औरंगाबाद व भिख्खू पयाबोधी थेरो नांदेड व त्यांचा भिख्खू संघ यांच्या हस्ते गौतम बुद्ध मूर्ती थायलंड या देशातून मागवून घेण्यात आली त्रिसरण पंचशील अष्टगाथा व बौद्ध पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली गोणार गावचे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री जे डी गोणारकर, सिद्धार्थ गोणारकर, विजय गोणारकर, जीवन गोणारकर, प्रा.अविनाश नाईक व सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व कर्मचारी, व गावातील सर्व धम्म मित्र मंडळी, व गोणार या आसपास असलेली सर्वे गावे सिरसी, खंडगाव, जाकापुर, रहाटी, बारूळ, वरवंट, पेठवडज, कळका या सर्व गावचे
धम्म मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते व गावातील माता भगिनी उपस्थित होत्या यांच्या उपस्थितीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना करण्यात आली