
दैनिक चालू वार्ता चिखलदरा तालुका प्रतिनिधी – प्रवीण मुंडे
मेळघाट हा भागअतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जात असतो .सर्वात जास्त निधी सरकार कडून मेळघाटात दिला जातो तरीपन रस्त्यांची दुर्दशा होत होत आहे .
याला जबाबदार कोण आहे ? भांडूम पासून अमरावती चांदूरबाजार परतवाडा अश्या बसेस चालतात .
रस्त्यात खड्डे जास्त असल्याने प्रवाशांना एक दोन किलोमीटर बस मधून उतरून पायी चालत जावे लागते अशा परिस्थितीत शालिता सुमिता एकताइ खुटीदाआणि भांडुम येथील नागरिक . अशा परिस्थितीला रोज सामोरे जातात हे गावे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरआहेत जिल्ह्याचे ठिकाण 160 किलोमीटर तर तालुक्याचे ठिकाण 100 किलोमीटर चे असल्याने अश्या परिस्थितीत चुरणी
तालुका तर अचलपूर जिल्हा करावे अशी मागणी काही वर्षापासून होत आहे .तेव्हाच या गावांच्या विकास होऊ शकतो असे येथील नागरिक वारंवार बोलत असतात.
दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधींनी तेथील नागरिकांची प्रतिक्रिया घेतली असताअसे लक्षात आले की सरकार किंवा लोकप्रतिनिधी कोणाचेही याकडे लक्ष नाही…