दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा येथील मार्केट कमेटीच्या आवारात एका ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली.कोणीतरी आज्ञात आरोपीने तरुणास बेदम मारहाण करून मृतदेह बेवारस ठीकाणी टाकून मारेकऱ्याने पळ काढल्याची खळबळजनक घटना ( ता.०८ ) रोजी उघडकीस आली.
प्रदिप भाऊराव कायंदे रा.उबंरखेडा ता देउळगावराजा अशी मयताची ओळख असून
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जालना येथील एच डी एफ सी बँकेत वसुली अधिकारी पदावर कार्यरत असलेला मूळचा उंबरखेडा ता देऊळगाव येथे राहत असलेला प्रदीप भाऊराव कायंदे घरचे बांधकाम चालू असल्याने तूर्तास आपल्या धाकट्या भावासह देऊळगाव राजा येथे राहत असे पिकअप व्हॅन चालवून व मयत भाऊ नोकरी करून एकत्र उदर निर्वाह करीत असत बांधकामाच्या कारणे उंबरखेडा येथे येत असत शुक्रवार ०७ रोजी भावास(मयत प्रदीप) मिस्त्री येत असल्याने लवकर येण्याचे कळविले पण मला उशीर होईल असा निरोप मिळाला
मात्र ( ता.०८ ) शनिवार रोजी पत्नी कडून भावाच्या अपघाताचे वृत्त मिळाले त्याने भावाचा फोन डायल केला असता मंठा पोलिसांनी फोन उचलला व मार्केट यार्ड मधील विश्वनाथ संपतराव बोराडे यांच्या घरासमोरील मैदानात प्रदीप मृतावस्थेत असल्याचे सांगितले शव विच्छेदनाचे वेळी भाऊ सतीश कायंदे याने मृत भावाच्या डोक्यात जबरदस्त मार लागून रक्त वाहत असलेले ,शिवाय हाता पायावर पाठीवर मारहाणीच्या जखमा व वळ दाखविल्या म्हणजेच अज्ञात मारेकऱ्यांनी मारहाण केल्याने सदर तरुण मरण पावल्याचे लक्षात आले
या संदर्भात उप विभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे पो नि संजय देशमुख स पो नि शिंदे यांनी घटना स्थळी सकाळीच भेट देऊन पंचनामा केला कलम ३०२ ,२०१ भादवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो नि संजय देशमुख स्वतः करीत आहेत