
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:पक्ष कोणताही असो झेंडा अन् दांडा हा कार्यकत्यांच्या हाती असतो. निवडणुकीनंतर गुलाल उधळण्याचे कामही हीच कार्यकर्ते मंडळी उत्साहाने करते; परंतु, साहेब आमदार, खासदार झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी संधी मिळेल म्हणून चपला झिजवणाऱ्या बहुतांश निष्ठावंत कार्यकर्त्यांच्याही पदरी निराशाच पडते, जिल्ह्यातील राजकारण नेहमीच कुटुंबाभोवती फिरत असल्याने सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी गुलाल लागणार? आगामी निवडणुकांत वारसदारांच्या चर्चेने इच्छुकांचा आवाज दाबला जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश पालिका, नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. आजघडीला महाविकास आघाडीमुळे काँग्रेससोबत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजप अन् शिवसेना (शिंदे गट) यांच्यापेक्षा अधिकची ताकद महाविकास आघाडीचीच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देऊन तीनही पक्षाची मोट बांधून ठेवण्याची किमया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना साधावी लागणार आहे. त्यात बहुतांश आमदारांचे पुत्र, कन्या अथवा पत्नी, भाऊ राजकारणात येऊ पाहत आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राजकीय वारस म्हणून श्रीजया चव्हाण भोकर अथवा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे राजकीय गोटात बोलले जात आहे. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही राजकीय एन्ट्रीची शक्यता नाकारता येत नाही.तर
खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मुलगी प्रणिता देवरे यांना आमदार करण्याचा प्रण केला आहे. त्यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघ अथवा लोहा- कंधारमधून मैदानात उतरविले जाऊ शकते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय वलय आणि कार्यकत्यांचे जाळे तयार केले आहे.
माजी खासदार भास्करराव स्वतगावकर यांनी स्नुषा डॉ. मीनल स्वतगावकर यांना राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर; परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात एन्ट्री करून त्यांनी आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. त्या नायगावमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे राजकीय वारस म्हणून प्रा. रवींद्र चव्हाण देखील आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत.
त्यांच्या माध्यमातन आपला राजकीय
वारस पुढे आणण्याचे काम नेत्यांकडून केले जाईल. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषद, महानगरपालिका अथवा इतर कोणत्या न कोणत्या निवडणुकीत राजकीय आखाड्यात उतरविले जाईल. आहे. परंतु, साहेबांना आमदार करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या कार्यकत्यांनी काय मग केवळ सतरंज्याच उचलत राहायच्या का, असा सवाल इच्छुक कार्यकत्यांकडून दबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे आमदारांच्या कुटुंबातील
कोणीतरी पढे आले की कार्यकर्तेआपली इच्छादेखील व्यक्त करण्याचे सोडून देत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील बहुतांश आमदारांच्या कुटुंबात कोणी न कोणी जिल्हा परिषद, महानगरपालिकेची तयारी करत आहे.तर काही नेत्यांनी मात्र वारसाला राजकारणा पासून दूर ठेवले आहे