
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीगर- मोहन आखाडे
छत्रपती संभाजीनगर,येथील सिडको एन-5 कॅम्युनिटी सेंटर येथे लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने अन्न वाचवा समितीचे अन्न नासाडी बद्दल जागृती अभियान घेण्यात आले.
लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासक/आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. लाइटहाऊस 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरुणांना मोफत कौशल्य अभ्यासक्रम आणि शाश्वत उपजीविका देते.
आजच्या कार्यक्रमात अन्न वाचवा समितीचे सदस्य प्रभाकर दिवटे यांनी प्रस्तावना केली, कार्यक्रमात प्रमुख अनंत मोताळे यांनी अन्न नासाडी बद्दल विस्तृत उदाहरण सह प्रबोधन केले, यावेळी विद्यार्थ्यांना जेवताना ताटात उष्टे अन्न न सोडण्याचा संकल्प राजेंद्र वाहुळे यांनी दिला , चंद्रकांत वाजपेयी यांनी मौलिक मार्गदर्शन केले , कार्यक्रमास नागेश गव्हले, महेंद्रकुमार सकलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला विद्यार्थीसह, कर्मचारी, अधिकारी अभियानात सहभागी झाले. प्रशिक्षण केंद्राच्या आधिकारी पुजा मोगरे, श्रीकांत साळवे, ओम गुप्ता, निता वाणी, पुजा देडे,साक्षी घोडके, गौरव मुसळे, गोपाल मुंदडा यांनी अभियानास खूप चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर अन्न वाचवा समिती चे अंनत मोताळे यांनी जागतिक भूक निर्देशांक अहवालानुसार जागतिक भुकमरीमध्ये भारतही आहे व त्याची काय कारणेही विशद केली त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते अशी ठिकाणे आणि त्याबद्दल चर्चा केली तसेच ते रोखण्याचे उपाय सांगितले आणि पर्यावरणावर अन्नाच्या नासाडीचे किती घातक दुष्परिणाम होतात,जसे की मिथेन वायु तयार होऊन अतिवृष्टी चे प्रमाण कसे वाढते हे देखील वर्णन केले.व गत 2014पासुन अन्न वाचवा जागृती अभियान सुरू केले
लाइट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन मधील विद्यार्थ्यांनी अन्नाचा अपव्यय न करण्याचा संकल्प केला. एकूणच हे सत्र फलदायी ठरले कारण विद्यार्थ्यांना अन्नाच्या नासाडीचे महत्त्व कळाले.
लाईटहाऊस कम्युनिटीज ने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले