
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
====================
निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथे महापुरुषांची सामुहिक जयंती साजरी करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ठिक सात वाजता डॉ.आंबेडकर चौक येथे बैठक होऊन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची सामुहिक जयंती तेरा व चौदा एप्रिल रोजी वैशिष्ट्यपुर्ण विविध उपक्रमानी करण्यात येणार असुन या सामुहिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सरपंच हरिदास बोळे तर कार्याध्यक्षपदी उपसरपंच दिगंबर सुर्यवंशी यांची निवड करण्यात येऊन खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली त्याप्रमाणे उपाध्यक्ष वामन कानडे धनराज कांबळे कोषाध्यक्ष दत्तू सूर्यवंशी सचिव संदेश काळे सहसचिव गणेश शिंदे सदस्य म्हणून बालाजी कानडे सुग्रीव काळे पंकज कानडे बालाजी सूर्यवंशी चंद्रकांत वग्गे वरुन कानडे माधव काळे रावसाहेब काळे औदुंबर कांबळे संदीप कांबळे सचिन शिंदे दिनकर कांबळे विकास कांबळे हणमंत सूर्यवंशी काशिनाथ काळे लहू सूर्यवंशी आदी तर सल्लागार म्हणून गोपाळ नारायणपुरे बालाजी लादे अरविंद उस्तूरे उस्मान पटेल विजयकुमार पाटील राम भोजने अनंत पाटील मोहन पाटील कुमार लादे सचिन मिरगाळे अप्पाराव लादे चांदपाशा शेख अलिम पटेल पाराप्पा कांबळे रमेश भोजने काशिराम लादे गणेश पाचंगे बसवराज पाटील वैजनाथ देशमुख धनराज देशमुख वाजिद मुल्ला मदन कांबळे वैजनाथ टोपन्ना यांची निवड करण्यात आली.