
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर: – मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३२ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक ५ व ६ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय येथे संपन्न झाले. या अधिवेशनात पर्यावरण, कामगार, आरोग्य आणि वैश्विक समाज या विषयांवर आधारित शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. यावेळी परिषदेतर्फे विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यातील महत्वपूर्ण समजला जाणारा डॉ. प्रदीप आगलावे उत्कृष्ट प्राध्यापक व संशोधक पुरस्काराने (२०२३) ने डॉ. नारायण कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.त्या बद्दल येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
समाजशास्त्र विषयातील अध्ययन,अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाते. डॉ. नारायण कांबळे हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरले आहेत. यापूर्वी हा पुरस्कार अखिल भारतीय समाजशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. जगन कराडे यांना देण्यात आला होता.
डॉ. नारायण कांबळे हे शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर विभागात कार्यरत आहे. यापूर्वी त्यांनी समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आजवर त्यांची २५ पेक्षाही अधिक अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली असून काही पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कारही त्यांना यापूर्वीच मिळाला आहे. सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य असून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या प्राधिकरणावरही कार्यरत आहेत.
यावेळी सम्राट मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, रिपाईचे तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,प्रा.डाॅ.सतिश ससाणे,दत्ता कांबळे, बाळु कराड,अजय मुरमुरे,अरुण वाघंबर, आकाश सांगविकर, राहुल गायकवाड, बालाजी गायकवाड, गणेश मदने,सतिश जंगले,शेख कलिम यांच्यासह महाराष्ट्रातील विविध समाजशास्त्राच्या प्राध्यापकांची उपस्थिती होती