
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
वाशिम : जे काही चांगले सुरू आहे ते पत्रकारितेमुळे सुरू आहे. तरीही पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड हाल सोसावे लागतात.ही पत्रकारितेत काम करणाऱ्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. ज्या पत्रकारांचे शोषण सुरू आहे, ते इतरांच्या शोषणाला लेखणीतून काय न्याय देणार ? पत्रकारांच्या वाईटपणाला जबाबदार कोण ? अशा अनेक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून,पत्रकारांना व पत्रकारितेला भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी केवळ पुढाकार नव्हे, तर कृतिशील कार्यक्रम राबवून ” व्हॉईस ऑफ मीडियाचा ” लढा हा शेवट पर्यंत पत्रकार आणि पत्रकारितेच्या कल्याणासाठी असेल..! असा संदेश संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, समाजातला दृष्टीकोण आणि प्रत्येक घटक पत्रकारांच्या वाईटपणाला जबाबदार आहे. मात्र ” समाज, पत्रकार नेहमी माध्यमांचे मालक आणि सरकार यालाच पत्रकार आणि पत्रकारितेच्या अधोगतीला जबाबदार धरतात, ते जबाबदार आहेतच..! ” पण, अन्य जबाबदार घटक कोण, यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा रामबाण उपाय म्हणजे व्हॉईस ऑफ मीडिया ” आहे. आपल्या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे घर, मुलांचे शिक्षण, नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण, त्यांना व्यवसायाकडे वळविणे, पोर्टल ऑन लाईनला शासकीय सवलती मिळवून देणे, ज्यांची पत्रकारितेत १० वर्ष झालीत त्यांना अधिस्वीकृती कार्ड देणे, सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन, पत्रकार जोपासत असलेल्या छंदासाठी शिष्यवृत्ती, बाहेरच्या देशात,अन्य राज्यात अभ्यास दौऱ्याचे आयोजन आदींसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कृतिशील कार्यक्रम राबवून हा लढा आपल्याला शेवटपर्यंत लढायचा आहे.