
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई दौंड
वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. महावितरण कंपनीकडून पुन्हा एकदा शेतीपंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन तोडले जात आहे तर काही ठिकाणी डीपीच बंद केला जात आहे. तालुक्यातील केंद्रावरील कृषीचे फिडर बंद करण्यात आलं आहे. यामुळे ऐन भिजवणीच्या काळात कृषी पंप पाणी असून बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग खूप अडचणीत आलेला आहे यासाठी सरकारकडून त्यांना वीज जोडणी अपेक्षित आहे भाजपचे किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, नेतृत्वाखाली दौंड महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी कार्यालयाचे प्रमुख अभियंता यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विज लाईट द्यावी ही विनंती समस्त भाजप नेते व कार्यकर्ते शेतकऱ्यांनी केली यावेळी दौंड तालुका अध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी जर कनेक्शन दुरुस्ती व लाईट न जोडल्यास मंगळवारी तीव्र आंदोलन केले जाईल असे या वेळेस म्हटले आहे या वेळी भाजपच्या अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.