दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.9 शिरूर तालुक्यातील उरळगांव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या गणेश मंदिरात अथर्व शीर्ष पठणचे वाचन करण्यात आले. या वेळी असंख्य महिला भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमात उस्फूर्तपणे भाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन शिवशक्ती तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ उरळगाव यांनी मोठया भक्ती भावाने केले होते.
या प्रसंगी अथर्व शीर्ष पठण वाचणासाठी पुरोहित म्हणून हरिश्चंद्र पोपळघट व निळोबा नवले यांनी यांनी पुढाकार घेतला.
महिलांमध्ये मा. उपसरपंच सौ स्वातीताई कोकडे, प्रिया मुथा, सुनिता पोपळघट, सविता कोकडे, मनीषा गिरमकर, पार्वती पोपळघट, नंदा वेताळ, निकिता नवले, निकिता पोपळघट, प्रिया नवले, नंदा नवले, संगीता नवले, हिरा घायतडक, सुनिता घायतडक, सुनिता वायदंडे, वैशाली मुथा, उज्वला चव्हाण, अनिता चव्हाण, कोमल ढमढेरे, लताबाई कोकडे, रंजना नवले, पूनम जसाभाटी आदी असंख्य महिलांनी सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने श्री गणेश चतुर्थी साजरी केली.
या वेळेस मा सरपंच सौ स्वातीताई कोकडे म्हणाल्या की गावात नवीन गणेश मंदिर झाल्याने महिला व समस्त ग्रामस्थ यांच्यात एक नवीन ऊर्जा पाहायला मिळत आहे, मंदिर एवढे भव्य झाले आहे की गावाला एक नवीन रूप आले आहे, लोकांच्या मनात एक भक्तीभाव उसळून आला आहे. सर्वांचे हे श्री गणेश मंदिर श्रद्धास्थान झाले आहे, श्री गणेशाची अशीच मनोभावे पूजा करून आपले गाव प्रगती पथावर नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी रुक्मिणी मधुकर घोलप ,अनिता बाळासाहेब चव्हाण ,कल्पना सुनील चव्हाण, तर्फे सकाळी सर्वाना खिचडी वाटप करण्यात आले.
श्री गणेश मंदिरात चतुर्थी निमित्त संजय जांभळकर यांस कडून श्री गणेश नावाचा बोर्ड देण्यात आला.