
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी:-सौरभ कामडी
पालघर(मोखाडा)आज दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी मौजे टाकपाडा (मोखाडा) ता.मोखाडा जि. पालघर येथे श्री. भिकाजी बुधाजी माळी यांच्या घराला शॉक सर्किट मुळे दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी रात्री २ वाजता आग लागून खुप मोठे नुकसान झाले . “विचार तुमचे आमचे सर्वांचे” या व्हाट्सअप गृपला ही बातमी कळताच तत्परतेने सदर पिडीत कुटुंबाला मदतीचा हात देत आज रोजी “विचार तुमचे आमचे सर्वांचे” या व्हाट्सअप गृप मार्फत त्यांना १०,००० रु रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यात आली या प्रसंगी ग्रुपचे सन्माननीय मान्यवर श्री.डी.के.पाटील साहेब श्री.आनंद शिंदे , श्री.मिलिंद बदादे , व पीडित कुटुंबातील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .”विचार तुमचे आमचे सर्वांचे या व्हाट्सअप गृपचे गृप ऍडमिन श्री. हरीश शिंदे यांनी ग्रुप सदस्यांचे मदत केल्यामुळे आभार मानले