
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
शहरी पत्रकारांना ज्या अत्याधुनिक सुविधा मिळतात तशा सुविधा ग्रामीण पत्रकारांना मिळाव्यात यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाला माझ्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करणार,अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे खाजगी सचिव तथा मुंबई मंत्रालयातील अप्पर जिल्हाधिकारी व कळंबचे भूमीपुत्र डॉ निशिकांत देशपांडे यांनी दिली.
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने कळंब येथील पत्रकार भवन येथे भूमिपुत्र अप्पर जिल्हाधिकारी डॉ निशिकांत देशपांडे आणि जेष्ठ पत्रकार शिवाजी कांबळे यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अशोक शिंदे, व्यासपिठावर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी निरफळ हे होते. या वेळी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी देशपांडे सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
त्यांनी आपल्या मनोगतात विविध पदावर असताना केलेल्या विशेष कामांचा उल्लेख करून माझ्या परीने कळंब तालुका पत्रकार संघासाठी जे सहकार्य करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करीन.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात निशिकांत देशपांडे यांच्या कार्य कृतत्वाचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले.
शेवटी पत्रकार बालाजी अडसूळ यांनी आभार मानले. या वेळी सतीश टोणगे, शितल कुमार घोंगडे, रमेश अंबिरकर रमेश रीतापुरे, सचिन क्षीरसागर उपस्थित होते.