
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील एकुरका येथे महावितरण कंपनीच्या अव्यवस्थेचा आणखी एक बळी गेला असून वीजपुरवठा बंद करण्याचे ‘परमिट’ घेतले असतानाही वीज वाहिन्यांत अचानक प्रवाह उतरल्याने विकास जनक घोगरे या ३८ वर्षीय तरूणाचा बळी गेला आहे. एकुरका गावात शेतीसाठी एक दिवसाआड व रोहित्रावरही एक सर्किट एका दिवशी याप्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. शुक्रवारी रात्री याच शेड्यूलनुसार पुरवठा राहणार होता. दरम्यान, गावातील विकास जनक घोगरे विद्युत पुरवठा बंद असल्याने हे सर्वे क्रमांक ८४ मधील यादव यांच्या शेतातील मुख्य वाहिनीच्या जंपरीगचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढले. यावेळी त्या खांबावरील वाहिण्यात अचानक विद्युत प्रवाह सुरू असल्याने विकास यांना विजेचा शॉक लागला. यात गंभीर भाजल्याने कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून मंगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर शनिवारी दुपारी एकुरका येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या प श्चात एक भाऊ ,आई वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती अव्यस्तेचा बळी ठरल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.