
चंद्रपूर : प्रतिनिधी
प्रमोद खिरटकर
संविधान दिनानिमित्त एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल नांदाफाटा येथे आज “माझे संविधान माझा अभिमान “या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्याकडून संविधानाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक नितेश शेंडे, शिक्षक अखिल अतकारे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान दिनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संविधान दिनानिमित्त ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर वतृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खुशी गेडाम, आचल चव्हाण, चैतन्य चूधरी, ऋग्वेद बिलबिले, रितिका पवार, दीपिका पवार पूर्वा वासेकर, तृप्ति गव्हाने, आदित्य चव्हाण इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रूपाली कौरासे यांनी तर आभार प्रदर्शन निशा भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहायक शिक्षिका निशा भोयर, पुष्पा गायकवाड़, श्वेता देरकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संगीता ठाकरे ,सविता हनुमंते यांनी सहकार्य केले.