
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट – तालुक्यातील मौजे जलधरा पासून आठ किलोमीटर अंतरावर अनेक वर्षापासून असले मनले मौजे मांजरी माथा आणि वाघदरी हे गावे अनेक सुविधा पासून वंचितआहे. नेहमी या गावाकडे आमदार भिमराव केराम,माजी आमदार प्रदीप नाईक, खासदार हेमंत पाटील हिंगोली, जिल्हाधिकारी नांदेड यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज होती व आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व तहसीलदार मृणाल जाधव यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मे २०२२मध्ये या गावची पाहणी करून मौजे मांजरीमाथा व वाघदरी गावाच्या नागरिकाच्यां अडीअडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचे आश्वासन दिले होते.परंतुअद्यापही अंमलबजावणी केली नाही.मौजे वाघदरी, मांजरीमाथा गावाचा महसूल आकार बंदी करून जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवणार, दर्याखोऱ्यात वसलेल्या मौजे वाघदरी,मांजरीमाथा या गावचा म्हणावा तेवढा विकास न झाल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना भौगोलिक सोयी सुविधा अभावी येथील आदिवासी नागरिकांना नेहमी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने येथील आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना शासकीय योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वनहक्क कायदे अंतर्गत दावे मंजूर करून त्यांना जमिनी देणे आणि आरोग्याच्या सोयी सुविधीसह घरकुल,राशन कार्ड, पाणीपुरवठा,वीज पुरवठाअशाअनेक योजनेचा लाभ देण्यासाठी हा सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन नागरिकांना भेटून आश्वासन दिले होते.तेथील नागरिकांचा वेळ वाचावा व आर्थिक नुकसानही होऊ नये यासाठी गावातच कॅम्प लावून कागदपत्रे घेण्यास सांगितले होते.कॅम्प लावले कागदपत्रे पण नेले तेवढ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार यांची बदली झाल्यामुळे आम्हाला आतापर्यंत कोणतेही दाखले मिळालेले नाहीत.आमचे सर्व प्रस्ताव धूळखात पडूनआहेत की काय? कळेनासे झालेआहे.येणार्रा आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, आमदार,खासदार निवडणुकीत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकून आमदार खासदार यांना गावबंदी करु,असे ही मत गावातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते वनसमिती अध्यक्ष दत्ताजी नारायण भवाळे यांनी मत व्यक्त केलेआहे.
आजही आमचे पारतंत्रे सारखे तेच हालआहेत.शाळेतील शिक्षकांना रोज पायपीट करावे लागतअसते.आमच्या गावातील मुलांमुलींचे लग्न वेळेवर होईनात,पक्का रस्ता नसल्यामुळे मुलीं कोणी देण्यास तयार नाहीत आणि मुली करण्यास सुद्धा तयार नाहीत.त्यामुळे मुलींचा विवाह करणे सुद्धा अवघड होतआहे.अचानक माणूस बिमार पडला तर झोळी करून त्यामध्ये टाकून नेले जात होते. दवाखान्यात येई पर्यंत तो जगतो का मरतो याची शाश्वती सुद्धा नसते.तेव्हा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांचे राहिलेले काम सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी करावेअशी मागणी गावातील नागरिक व तरुण मंडळी करीतआहे.अन्यथा एकाही राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीला आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना गावात पाय ठेवु देणारं नाही.हे लक्षात ठेवावे,असे शेवटी म्हणाले आहे.भविष्यात हा विषय चिघळला जावु शकतोआहे.