
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मौजे निळा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माता द्रौपदा देवी शेतकरी विकास पॅनल चा दणदणीत विजय मिळवित वर्चस्व प्रस्थापित केले असून त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर समर्थकांचा धुव्वा उडविला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
लोहा तालुक्यातील मौजे निळा येथील सेवा सहकारी सोसायटी २०२३-२०२८ पंचवार्षिक निवडणुकीत दि. ९-४-२०२३ रोजी पार पडली यात माता द्रौपदा देवी शेतकरी विकास परिवर्तन पॅनल निळा यांनी या निवडणुकीत दणदणीत एकहाती सत्ता काबीज करून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर समर्थक विद्यमान चेअरमनचा व त्यांच्या पॅनलचा या निवडणुकीत सुफडासाफ करून सर्व जागी पॅनल प्रमुख बाबजी रेशमाजी पाटील मोरे, गणेशसिंह गहलोत ,उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील मोरे,पांडुरंग पाटील मोरे,कल्याणराव माली पाटील मोरे, यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय प्राप्त केला.
यात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे इंगळे मोतीराम रेशमाजी, कल्याणकर विठ्ठल दता,जाधव गणेश माणिका, मोरे किशन दता, मोरे गंगाधर संभाजी, मोरे बाबजी रेशमाजी, मोरे विठ्ठल नरबा,मोरे विठ्ठल साहेबराव , कांबळे मोतीराम गोपाळ हे सर्व उमेदवार विजयी झाले तर या अगोदर गणेशसिंह गहलोत हे बिनविरोधपणे निवडूण आले.
या सर्व विजयी उमेदवारांनी लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर या सर्व विजयी उमेदवारांचा व नवनिर्वाचित चेरमन बाबजी पाटील मोरे व सर्व सदस्य याचा भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा मन्याड फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकनाथ दादा पवार यांच्या वतीने मुंरबीचे सरपंच रामेश्वर पाटील पवार, मन्याड फांऊडेशनचे तालुकाध्यक्ष तथा निळाचे उपसरपंच गजानन पाटील मोरे, पांडूरंग पाटील लोंढे, संपर्कप्रमुख संग्राम पाटील डिकळे यांनी शाल पुष्पहार घालून सत्कार केला.