
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-
परतूर:तालुक्यातील हातडी
ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे अंदाजे ३५ वर्ष जुने वडाचे झाड गावातील एकाने बेकायदेशररित्या तोडल्याची तक्रार हातडीच्या सरपंचांनी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे. केशव बाबसाहेब कदम असे झाड तोडणाऱ्या व्यक्तीचे नाव असून सदरील जुने झाड बेकायदेशीररित्या तोडणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच रेणुका मधुकर झरेकर यांनी वन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या प्रकरणी वन अधिकारी संबंधित व्यक्तीवर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप
कारवाई करण्यास जाणीपूर्वक
सरपंच रेणुका झरेकर यांनी केला.