दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील मौजे धारासुर येथे स्थित राज्य संरक्षित असलेल्या गुप्तेश्वर मंदिरास रविवार दिनांक 09 एप्रिल 2023 रोजी हेमाडपंथी मंदिरे आणि गड किल्ल्याच्या जतन,संवर्धन तसेच जिर्णोद्धार साठीच्या कामाचा खूप मोठा अनुभव असलेले आंध्र प्रदेशचे सध्या छत्रपती संभाजी नगर येथे स्थित असलेले गायत्री कॉन्ट्रक्शन व आर्किटेकचे शासकीय कॉन्ट्रॅक्टर नरसिंह राव यांनी या मंदिराची पाहणी केली. यावेळी त्यांनी देवदर्शन सुद्धा केले.
धारासुर येथील ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी गुप्तेश्वर बचाव अभियान संघर्ष समितीचे सदस्य निवृत्ती कदम, दगडूदादा जाधव, ज्ञानेश्वर कदम सर, जयराम कदम, मनोज कदम, बालासाहेब नेमाने, अंगद जाधव, अनिल जाधव, भगवान कदम, पुरुषोत्तम कदम, राजेभाऊ कदम यांच्यासह गुप्तेश्वर बचाव अभियान संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.