
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा अग्निपंख शैक्षणिक समूह च्या वतीने राज्यस्तरीय नवोपक्रमशिल शिक्षक स्पर्धा वर्ष २०२२- २३ आयोजन केले होते. राज्यभरातून या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिंबेवडगाव केंद्र – विडोळी ता. मंठा जि. जालना येथील उपक्रमशील शिक्षक नारायण किसनराव राठोड यांचा राज्यस्तरावर नवोपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.श्री एन. के. राठोड हे शाळेमध्ये विविध नवनवीन विद्यार्थी उपयोगी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवत असतात. त्यांचा २९ मे २०२३ रोजी यवतमाळ येथे सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचं सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.