
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी .
●बिलोली: मौजे आदमपूर येथील युवा कवी,गीतकार जाफर आदमपूरकर यांचा भाचा तथा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुखेड आगारातील वाहक शेख शब्बीर शहाहुसेन यांचा नऊ वर्षीय मुलगा शेख अदनान उर्फ रहेमान अली याचा आपल्या जीवनातील पहिला रमज़ान रोजा(उपवास) संपन्न झाला.
रमज़ान मासारंभाची जय्यत तयारी मुस्लिम बांधव दरवर्षी भक्तिभावाने करीत असतात. घरातील अथवा मोहल्ल्यातील बांधवांचे अनुकरण करीत लहान मुलांचाही रोजाप्रति उत्साह वाढीस लागत असतो.
सकाळी पाच वाजल्यापासून ते सायंकाळी पावणे सात पर्यंत अन्न,पाणी त्यागून हा रोजा पूर्ण करायचा असतो. लहान बालकांचा इश्वराप्रतिचा हा आदरभाव अतिशय शब्दातीत असतो. गाव आणि शहरातील मुस्लिम बांधवांनी मस्जिद मधील वातावरण अगदी फुलून गेल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.
लहान मुलांकडून हा कडक उपवास (रोजा) संपन्न झाल्यास थोरा मोठ्यांपर्यंत आनंदायी वातावरण आपोआप तयार होत असते.
सकाळी प्रहरी उठणे,पाच वाजता सहेरी म्हणजे उपवास बाळगणे, नमाज पठण करणे,कुराण पठण, रोजा,दानधर्म, इश्वराचा जपजाप आणि सायंकाळी पावणे सात वाजता इफ्तार म्हणजे उपवास सोडणे असा दिनक्रम रमज़ान महिण्यातील असतो. ह्या पुण्यकर्म बाबींना खूप अगदी प्रत्येक मुस्लिम बांधव मनोभावे जीवापाड जपत असतात.
सदरील मुलाचे कौतुक करीत त्याला सद्भावरूपी शुभेच्छां देण्यात आल्या.
शेख शब्बीर शहाहुसेन (वाहक रा.प.म.मुखेड),शेख कलीम, शेख बाबू मांजरमकर,फक्रूशा पिरशा मदार, महमदरफी मदार, सहाय्यक महाराष्ट्र ग्रामीण बँक, जाफर आदमपूरकर, शहा मैनोद्दिन, शहा अहेमद, शहा उस्मान कासराळीकर, शेख फारूक सांगवीकर, शहा अजिमोद्दीन सर्व मुस्लिम बांधव आणि पाहुणे अदनानचे सर्वञ कौतुक होत आहे.