
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड-/अंबाजोगाई–
अंबाजोगाई तालुक्यातील कोपरा अंजनपुर सेवा सहकारी सोसायटीत 55 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले आहे चुरशीच्या लढतीत देशमुखांना गुलाल लागला आहे .अंजपुर – कोपरा सेवा सोसायटी परिवर्तनात नवयुवकांचा मोठा वाटा आहे.
अंजनपुर कोपरा सेवा सोसायटीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान झाले या सेवा सोसायटीत 55 वर्षानंतर सत्ता परिवर्तन घडले असून 55 वर्षे सत्तेमध्ये असणाऱ्या रेड्डी यांचा शेतकरी शेतमजूर पॅनल आणि कोपरा अंजंपुर येथील देशमुख यांचा काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनल मध्ये लढत झाली दोन्ही पॅनलच्या एक एक जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. अकरा जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली .अंजनपूर कोपरा येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत काळभैरवनाथ पॅनलचा अकरा उमेदवार विजयी झाले सेवा सोसायटी ताब्यात घेण्यासाठी देशमुख पॅनलचा 55 वर्षे संघर्ष सुरू होता .अखेर 55 वर्षानंतर सत्ता मिळवण्यात अंजनपूर कोपरा येतील देशमुख यांच्या पॅनलला यश मिळाले आहे. विद्यमान चेअरमन अशोक
रेड्डी यांच्या शेतकरी शेतमजूर पॅनलचा सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत दारुण पराभव झाला. संदिपान काका देशमुख,विष्णू देशमुख, बंकट देशमुख, अंकुश नारायणपुरे ,ज्ञानोबा देशमुख, आचित शितोळे ,प्राध्यापक अमर भोसले, अर्जुन तट,भास्कर देशमुख, , गोपीनाथ इंगले, ,प्रवीण देशमुख ,मनोज देशमुख, धर्मराज देशमुख, अंकुश देशमुख,भीमराव जोगदंड ,रोहिदास लोखंडे ,युवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनलने सेवा सोसायटी दणदणीत विजय मिळवला.
55 वर्ष नंतर सेवा सहकारी सोसायटी ताब्यात आल्याने मोठ्या उत्साहात विजय उमेदवाराची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला . विजयी मिरवणुकीत महेश देशमुख, अतुल देशमुख ,गोविंदराव देशमुख ,देसाई देशमुख ,नागोराव देशमुख ,मुरलीधर देशमुख ,भागवत देशमुख ,विक्रम देशमुख ,नंदाबाई भोसले ,पार्वतीबाई देशमुख ,अंकुश जोगदंड या विजयी उमेदवारासह बहुसंख्य समर्थक उपस्थित होते