दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील वझरगा गावातील जिल्हा परिषद शाळा बनली डिजिटल स्टार्स प्रकल्पांतर्गत “डिजिटल लायब्ररी” स्थापित करण्यासाठी राज्यातील १५२५ शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी शासनाकडून मंजूर झाली आहे. य योजनेंतर्गत त्या शाळांसाठी विद्यार्थ्यांना टॅब/लॅपटॉप आणि अन्य इन्सुमेन्ट दिले जाणार आहे. देगलूर तालुक्यातील गुणवत्तापूर्ण असलेल्या एक शहरी व दोन ग्रामीण असे फक्त तीन शाळांची निवड झाली आहे. त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरगा या शाळेचा समावेश आहे. ही वझरगा वासियांसाठी गौरवाचीच बाब आहे.
शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या दृष्टीने डिजिटल लायब्ररीची योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वाचनात भर पडेल विद्यार्थ्यांना ई-पुस्तके व जागतिक स्तरावरची कोणतीही माहिती अगदी सहज अवगत करता येईल. या दृष्टीने हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होणार आहे. या डिजिटल लायब्ररीच्या मंजुरीने वझरगा येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. बस्वराज पाटील वन्नाळीकर व सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.