
दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:आज निमगाव केतकी येथील व्याहळी जवळ असणाऱ्या वन विभाग क्षेत्रात मुख्य वन्य प्राण्यांसाठी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब निमगाव केतकी यांच्यावतीने सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आरोग्य दुत डॉक्टर इनामदार सर यांचा वाढदिवस चिंकारा व इतर वन्य प्राण्यांना पिण्याच पाणी सोडून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर इनामदार सर यांचा सन्मान करण्यात आला. या सत्कारानंतर डॉक्टरांनी वन्य प्राण्यांना उन्हाळा संपेपर्यंत आठवड्यातून दोन वेळा वन विभागाच्या टाक्यात पाणी सोडणार व मुक्या जनावरांना पाणी कमी पडून देणार नाही असे सांगण्यात आले. डॉक्टर इनामदार सर यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव केतकी येथील गणेश घाडगे यांच्या अष्टविनायक रुग्णवाहि के कडून रुग्णांना दिवसभर मोफत सेवा देण्यात आली अशी माहिती ॲड.सचिन राऊत यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी जाधव गुरुजी ,केशव हेगडे, दशरथ बनकर ,राजकुमार जठार, बबन खराडे ,श्रीकांत करे ,भानुदास राऊत ,संतोष घनवट ,गोरख आदलिंग, नाना चांदणे, राजू भोंग, गणेश घाडगे ,धनंजय राऊत, मंगेश भोंग, विशाल जगताप, विजय पाटील, कुलदीप हेगडे ,तानाजी जगताप, संतोष राजगुरू, तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.