
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड (वार्ताहर)
अग्निपंख शैक्षणिक समुह ता. उमरखेड जि. यवतमाळ तर्फे सन 2022-23 करिता नवोपक्रमशील शिक्षक राज्यस्तरीय गुरुगौरव पुरस्कार व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जि.प.प्रा.शा.सकनूर केंद्र बा-हाळी ता.मुखेड जि.नांदेड येथील सौ. नलाबले शोभा रामराव (मरेवाड) यांची निवड झालेली आहे.
सौ. नलाबले मॅडम ह्या शालेय स्तरावर विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवित असतात.
सदरील पुरस्काराचे वितरण दि.29/05/2023 रोजी श्रीराम मंगल कार्यालय दाणकी रोड,उमरखेड जि. यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.या निवडीबद्दल विविध स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.