दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमावर असलेले देगलूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेलं दिसत आहे या रुग्णालयामध्ये तेलंगाना व कर्नाटक तसेच देगलूर बिलोली तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयामध्ये येत असतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रुग्णांना थंड पाण्याची गरज भासते पण दवाखान्यात ही सुविधा नसून मशीन बंद अवस्थेत आहे गरीब रुग्णांना बाहेर हॉटेलमध्ये जाऊन वीस रुपयाची थंड पाण्याची बॉटल घेऊन प्यावं लागत आहे. जनरल वार्ड मधील पुरुषांना व महिलांना एकच स्वच्छालय असून त्या स्वच्छालयमध्ये घाणीचे साम्राज्य माजलेले आहे. रुग्णालयात जाऊन देगलूर प्रतिनिधी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता उडवा उडवी ची भाषा केली या ठिकाणी कर्मचारी कमी आहेत त्यासाठी शौचालयाची स्वच्छता होत नाही असे उत्तर अधिकाऱ्याकडून मिळत आहे. प्रश्न असा निर्माण होतो ज्या ठिकाणी स्वच्छतेची गरज आहे त्या ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही तर रुग्ण कसे बरे होतील .असे लक्षात येते की देगलूर उपजिल्हा रुग्णालयात लोकप्रतिनिधीचा अजिबात लक्ष राहिलं नाही का ? गोरगरिबांच्या आरोग्याची सुरक्षा रामभरोसे आहे का ? असे देगलूर शहरातील व तालुक्यातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर या विषयात लक्ष घालून देगलूर व देगलूर परिसरातील गरीब जनतेला योग्य वैद्यकीय सेवा कशी दिली जाईल याकडे लक्ष घातले पाहिजे