दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर व रमजान ईद उत्सव शांततेत साजरी करण्यासाठी कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटी तसेच नागरीकांची बैठक घेण्यात आली यावेळी कळंब प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा साबळे, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, एम.एस. ई. बी कळंब, व इतर प्रशासकीय अधिकारी, प्रतिनिधी हजर होते
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पुढारी, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पत्रकार बांधव, पोलीस मित्र, पोलीस पाटील, यांची मीटिंग घेण्यात आली. मिटींगचे व्यवस्थापन गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार श्री एस के मायंदे, पोलिस नाईक वाय.डी.चेडे, एस डी गायकवाड, एम दळवी, पी.पी जाधव यांनी केले होते. पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, रमजान महिना व रमजान ईद शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, सर्व समाजामध्ये सलोखा राहील याची दक्षता घेणे बाबत सूचित करण्यात आले. 140 ते 150 नागरिक उपस्थित होते