दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड सा.वा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दोन दिवसावर आली असतानाही तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पगार झाली नसल्याने कर्मचारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे जयंतीच्या आधी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पगारी नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोहन गवळे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे .
मुखेड तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालय आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे दरवर्षी शासन सणासुदीला व महापुरुषांच्या जयंतीच्या आधी कर्मचाऱ्यांची पगारी करून सण-उत्सव साजरा पार पाडत असते मात्र या दळभद्री शासनाने सत्तेत आल्यापासून कर्मचाऱ्यांची पगारी दोन दोन महिने होत नसून मार्च एण्ड मुळे कर्मचाऱ्यांच्या पगारी कर कपातीत गेल्यामुळे कर्मचाऱ्यात आर्थिक सचचन भासत आहे दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दोन दिवसावर आली असताना सेवेत असलेल्या सर्वच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पगारी अद्याप पर्यंत न झाल्याने कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून सदरील कर्मचारी शासनाचा निषेध करीत आहेत जयंतीच्या आधी समाज बांधव लेकरा बाळांना नवीन कपडे किराणा सामान भरून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो मात्र पगार न झाल्याने लेकरा बाळांना कपडे घेण्यासाठी व किराणा सामान आणण्यासाठी खिशात पैसे नसल्याने कर्मचारी हवालदिल झाला आहे तर तर महिला वर्ग ही शासनाच्या नावे बोटे मोडत आहेत तेव्हा जयंतीच्या आधी पगारी कराव्यात अशी मागणी समता समाज समता संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी मोहन गवळे, के एच. हासनाळकर, एम .बी .गायकवाड, बाबुराव होनवडजकर, धर्माजी वाघमारे आदीनी एका निवेदनाद्वारे केली आहे जर जयंतीच्या आधी पगार नाही झाल्यास तीव्र आंदोलन . करण्याचा इशारा गवळे यांनी दिला