दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी-इस्माईल महेबूब शेख.
====================
निलंगा: निलंगा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी श्रीमती उषाताई रमेश सुरवसे हे गेली दोन-तीन वर्ष झाले आपल्या शेतातील डीपी साठी त्रस्त होते आपल्या डीपीची व्यथा सूर्यवंशी परिवाराने अखिल भारतीय छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष दास साळुंखे यांना सांगितले नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेले तालुका अध्यक्ष साळुंखे यांनी महावितरणचे निलंगा विभागाचे कार्यकारी अभियंता पोवार साहेब यांच्याशी संपर्क साधून यांना डीपी मिळवण्यासाठी तात्काळ पाठपुरावा केला व तात्काळ मंजुरीचे पत्र घेऊन डीपी बसवण्यास भाग पाडले सुरवसे यांच्या शेतामध्ये डीपी दिनांक 9 रोजी बसवण्यात आला असून शेतकरी कुटुंब समाधान व्यक्त केले आहे