
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;:::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा जिल्हा परिषद सर्कल मधील इचोरा-दहेली ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शेतकरी सहकारी पॅनलचा दणदणीत विजय,सावळी सदोबा सर्कल मधील १३ सदस्यी सर्वात मोठी ग्राम विविध कार्यकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या ईचोरा-दहेली ग्राम कार्यकारी संस्थेचा काल निवडणूक निकाल लागला असून या निवडणुकीत शेतकरी सहकारी पॅनलचे १३ ही उमेदवार विजयी झाले आहे, ८ उमेदवारासाठी निवडणूक प्रक्रिया झाली असून,५ उमेदवार बिनविरोध झाले होते,सहकार क्षेत्रात अतिशय महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जात असून,ईचोरा ग्राम कार्यकारी संस्थेच्या निवडणुकीकडे परिसरातील सर्वच पक्षाचे लक्ष लागले होते,मात्र माजी सभापती सूर्यकांत जयस्वाल,रफीऊल्ला पठाण,विठ्ठल तुकाराम,किशोर जाधव यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढण्यात आली असून,या निवडणुकीत जयस्वाल गटाचे तेराही उमेदवार मोठ्या मताधिकांनी विजयी झाले आहेत,निवडणूक रणांगणात शेतकरी सहकारी जयस्वाल पॅनल कडुन उमेदवार ८ उभे असताना,सर्व उमेदवाराच्या विरोधात गावातील एकाच अपक्ष उमेदवाराने फॉर्म भरलेला होता,त्या उमेदवाराला आपली अमानत ही वाचवता आली नाही,बिनविरोध उमेदवारांमध्ये,किरण संजय राठोड,अशा हरीष ढोले, विठ्ठल गोविंदा चवडे,जोशना रोहिदास जाधव, सुनिता मधुकर जाधव, हे पाच उमेदवाराची बिनविरोध निवड झाली होती,उर्वरित ८ उमेदवारासाठी काल निवडणूक पार पडली, विजय उमेदवारामध्ये शिवम सूर्यकांत जयस्वाल,सुरेश शंकरलाल जयस्वाल, रामराव नंदू पवार,आयतुला रफीउल्ला पठाण, संजय नथुजी पाटील, मनोज उदयसिंग राठोड, नागो कानू तुमराम, ही आठ उमेदवार मोठ्या मताधिकाने निवडून आले, निवडणूक अधिकारी म्हणून जयश्री टी.हजारे यांनी काम पाहिले,विजय उमेदवारावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे,मागील ४० वर्षापासून ही ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था जयस्वाल गटाच्या ताब्यात असून,या संस्थेवर जयस्वाल गटांची एक हाती सत्ता आहेत.