
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
———————————————————
मोशी : जी. के. पी. जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सोसायटिचे कर्तव्य दक्ष चेअरमन संजीवन सांगळे . तर प्रमुख वक्ते श्री. रवींद्र आंबेकर होते.
महिलांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करण्यात आले. या प्रसंगी रावसाहेब गजभिये, स्वाति बेंद्रे, संगिता घोलप. यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली. प्रमुख वक्ते श्री. रविंद्र आंबेकर यांनी म. फुले यांच्या कार्याचे सविस्तर विवेचन करून दलीत, महिला, उपेक्षित कामगार व शेतकरी, विधवा, अनाथ यांच्या साठी केलेल्या महान कार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला व त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे सांगीतले.
अध्यक्षिय भाषणातून संजीवन सांगळे यांनी महापुरुषाच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचा आदर्श अंगी बाळगावा असे सर्वांना अवाहन करून म. ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी केलेल्या महान कार्याला नमन केले.
कार्यक्रमाचे आभार श्री. बेंद्रे यांनी केले . कार्यक्रमास , सौ.लता जाधव, सौ.शालनताई माजी शिक्षणाधिकारी बलराज पटील, नानाजी मोरे, दिगंबर पाटील, पांडुरंग चौगुले पंदरकर , नवनीत सोनार,दीपक पांचाळ,चव्हाण, अनेक महिला व पुरूष उपस्थित होते.