
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- शितल रमेश पंडोरे
प.पु.प्रेमानंदीनाथ महाराज जन्म शताब्दी सोहळा निमित्ताने पंचकुंडात्मक नवचंडी याग व देवी भागवत कथा संपन्न
भगवतीची कृपा, प. पू. अप्पा महाराज यांचे आशीर्वाद तसेच अंबरीश महाराज व अनिरुद्ध महाराजांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमानंदीनाथ महाराज जन्मशताब्दी सोहळा निमित्त झालेला छत्रपती संभाजीनगर चा सोहळा अत्यंत नयनरम्य व डोळ्यांचे पारणे फेडनारा होता.
03 तारखेला भव्य शोभा यात्रा काढून,यज्ञ व कथेस सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने भंक्तानी कार्यक्रमाचा लाभ घेतला. बाहेर गावाचा भंक्तातासाठी निवास,भोजन, व्यवस्था केलेली होती.
पंच कुंडात्मक नवचंडी यज्ञ , व प.पू.अंबरीश महाराजांच्या अमृततुल्य रसाळ वाणीतून देवी भागवत कथा , तसेच प. पू .अप्पा महाराजांचे अमूल्य असे मार्गदर्शन ,अनिरुद्ध महाजांचे गायन व युवराज अंब चे टाळ वादन याचा आनंद सर्वांना यामध्ये घेता आला . दुग्धशर्करा योग म्हणजे या कार्यक्रमाचे निमित्ताने सर्वांना गिरीजा माता ,राजेश्वरी ताई ,अनुपमा ताई यांच्या सह गुरू परंपरेचे एकत्रित दर्शन सर्व शिष्यांना व भक्तांना मिळाले . उपस्थित सर्वांचे भाग्यच उदयाला आले .या कार्यक्रमाच्या सर्व नियोजनात तन ,मन व धनाने सहभाग घेऊन सुंदर नियोजन केले .त्यांचे देखील करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे महाराज म्हणाले.
प.पु.अप्पा महाराजाचे आशिवर्चन व मार्गदर्शन सर्वांना मिळाले.देवी भागवत पुर्णावती व महाप्रसाद 9 एप्रिल 2023 रविवार दुपारी 2 वाजता होऊन कार्यक्रम संपन्न झाला. सर्वं भंक्तानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन संदगुरू सेवा कार्यांत आपला सहभाग नोंदवला.