
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
महाराष्ट्राचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद कार्यालयाची ओळख जनमानसात आहे. आज चंद्रपूर येथील जिल्हा परिषद कार्यालयात भेट दिली असता अजब प्रकार निदर्शनास आला. कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर महा पारेषन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित , सी.एस.आर निधीतून अशा प्रकारच्या फलकाचा उल्लेख असलेले MH31 FR 7174 या शासकीय वाहनावर आजही चक्क महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचेच फोटो दिसल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा ऐकायला येत होती.
आजच्या घडीला राज्यात शिंदे (शिवसेना) , भाजपा व समविचारी समर्थक आमदारांचे सरकार असताना या अशा प्रकारच्या मोठ्या चुका मुद्दाम केल्या जात आहे कि अनवधानाने झालेली चुक आहे हे अजुनही कळायला मार्ग नाही. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे अभ्यासु व क्रियाशील मंत्री म्हणून महाराष्ट्र भर सर्वत्र ओळखले जातात असला प्रकार त्यांच्याच गृह जिल्यातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आढळल्याने याबाबत ते काय एक्शन घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.