
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड – केंद्र व राज्य शासना मार्फत बीड तालुक्यामध्ये राबविण्यात येणा-या संजय गांधी निराधार योजना व श्रावनबाळ निवृत्ती योजना आक्टोबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीचे अनुदान प्राप्त झाले असून लाभार्थ्यां साठी बँके खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेत 7 हजार 926 लाभार्थीना रक्कम 4 कोटी 74 लाख 11 हजार 600 रुपये वितरीत करण्यात आली आहे. तसेच श्रावणबाळ निवृत्ती योजना 12 हजार 943 लाभार्थीना 7 कोटी 27 लाख 400 रुपये वितरीत करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर 5 एप्रिल 2023 रोजी वर्ग करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांनी अनुदान मिळण्यासाठी बँकेशी संपर्क साधून अनुदान प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सुहास हजारे यांनी केले आहे.