दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी-तालुक्यातील निराधार व दिव्यांगांचे थकीत पैसे व इतर प्रश्न यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनही त्यांच्या प्रश्नाकडे टोकाचे दुर्लक्ष केले जात आहे.हे प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा मुखेड तहसील कार्यालयाला शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिला आहे.
सातत्यपूर्ण विनंती व पाठपुरावा करूनही मुखेड तालुक्यातील निराधार व दिव्यांग यांचे अनेक महिन्यापासून थकीत असलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जात नाहीत.तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थी या मानधनापासून वंचित असून,त्यांना याचा लाभ मिळत नाही.तालुक्यातील निराधार व दिव्यांग यासाठी तहसील कार्यालयातील संबंधित विभागाकडे सातत्याने चकरा मारत आहेत.या निराधार व दिव्यांगांची हेतूपूरस्कर अडवणूक करून,त्यांची आर्थिक लूट केली जात आहे.हे अत्यंत संतापजनक आहे.हे निराधार व दिव्यांगांचे प्रश्न सुटले पाहिजेत,त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत.तहसीलदार यांनी यावर तात्काळ कार्यवाही करून हा प्रश्न सोडवावा अन्यथा या निराधार व दिव्यांगांना टोकाचे पाऊल उचल्याशिवाय पर्याय नाही.आणि याला सर्वस्वी तहसील कार्यालय जबाबदार असेल असा इशारा निवेदनात दिला आहे.