
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:नरसी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाने काल इतर खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासली असून नरसी येथील खंडोबा मंदिर व महादेव मंदिर गंगनबिड मंदिरात महाप्रसाद कार्यक्रमात उपयुक्त असलेले स्टील च्या ४०० प्लेट व स्टिलचे २०० ग्लास हे दोन्ही मंदिरानां भेट देऊन आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.वाढदिवस स्वताचा असो की नेत्यांचा पण नायगाव विधानसभा मतदारसंघातील बहुजनांचे नेतृत्व माणिकराव लोहगाव यांनी आपल्या कल्पकशक्ती तुन विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात मग पक्षी बचाव कार्यक्रम असो किंवा निनावी पायाने चालणाऱ्या गोरगरीब नागरिकांना चपल्या वाटपाचा कार्यक्रम असो किंवा ज्यां पारधी समाजातील गोरगरीबांच्या झोपडीवर मेन कापड नाही अश्याना वाटप करून मायेची सावली देण्याचा प्रयत्न असो त्यांच्या या अनेक उपक्रमाचे जिल्हास्तरावर नेहमीच चर्चा होत असते.
काल माणिकराव लोहगावे यांचा वाढदिवस उत्साहात पण अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाने संपन्न झाला. आपण समाजाचे देणे लागतो या उदांत हेतूने माणिकराव लोहगावे यांनी काहीतरी वेगळा उपक्रम राबवा ते समाज उपयोगी ठरेल अशा पद्धतीने उपक्रम राबविण्याचा संकल्प मित्र मंडळ समोर ठेवल्याने मित्र मंडळाने कुठलाही बडेजाव पणा न करता बॅनर जाहिरातबाजीसह इतर खर्चाला फाटा देत थेट हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गंगणबड येथील महादेव मंदिरास व नरसी येथील खंडोबा मंदिरात महाप्रसाद कार्यक्रमात उपयुक्त ठरणारे स्टील च्या ४०० प्लेट व स्टिलचे २०० ग्लास हे दोन्ही मंदिरानां भेट दिली.यावेळी दोन्ही मंदिर समितीने माणिकराव लोहगावे यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री क्षेत्र महादेव मंदिर गंगनबीड चे अध्यक्ष -शंकर रघुनाथ जाधव, सचिव- गंगाधर भाऊराव मोरे, पुजारी – उमाकांत गंगाधर स्वामी यावेळी माणिकराव लोहगावे मित्र मंडळाचे संभाजी मिसे, श्यामसुंदर कोकणे, वैजनाथ लोहगावे, हानमंत माजंरमे, गोविंद मामा तुप्पेकर, सदाशिव माने सर, परमेश्वर लोहगावे, व्यंकटराव भेरे, ज्ञानेश्वर भत्ते सर, प्रकाश मिसे, भत्ते सर रामेश्वर कोकणे हे होते, तर खंडोबा मंदीर नरसी येथे मंदिर समिती अध्यक्ष माधव मेकाले, मा. अध्यक्ष माधव वडजे, सचिव हानमंत कोकणे, गंगाधर वडगावे मा. तंटामुक्ती अध्यक्ष, मारोतराव मांजरमे, युवा नेते भास्कर कोकणे, पांडूरंग बागडे, दत्ता भरपुरे, दत्ता गागलेगावे, नंदकिशोर कोरे, मारोती दरेगावे, गजानन मुगावे, शिवाजी बडूरे आदीची उपस्थिती होती.