
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनिधी – वसंत खडसे
👉 रिसोड, मालेगाव तालुक्यातील गंभीर समस्यांचा अनंतराव देशमुख यांनी केला पाठपुरावा.
👉 आमची भेगा पडलेली ” वज्रमूठ ” नव्हे, तर विकासाची मजबूत ” मूठ ” उपमुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार.
वाशिम : जिल्ह्याचा विकासात्मक अनुशेष भरून काढण्यासाठी विविध योजनेमधून जिल्ह्याच्या विकासासाठी करोडो रुपयांच्या वाढीव निधीसह, केवळ जिल्ह्यातीलच नव्हते तर विदर्भातील एक जाणते नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अनंतराव देशमुख यांच्या रूपाने संपूर्ण जिल्ह्याला मजबूत नेतृत्व लाभले आहे, त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर कार्यकर्ते व मतदार संघातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नुकताच भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्या प्रवेशाचं परिवर्तन सामान्य जनतेच्या लक्षात यावे म्हणून, रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघातील अनंतराव देशमुख सुचवती त्या कामासाठी तात्काळ कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ..! असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज रिसोड येथे पार पडलेल्या भाजपच्या संकल्प सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनंतराव देशमुख यांनी जिल्हयासह रिसोड मतदार संघाच्या विकासात्मक दृष्टीने सादर केलेले मागणी पत्र हे वास्तव स्वरूपातील असून, ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांनी सादर केलेल्या सर्व मागण्या कृतीनुसार पूर्ण होतील शिवाय तालुक्यातील दयनीय अवस्थेत असलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांची पिक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. शेतकऱ्यांचा वीज समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले. आपल्या भाषणात मोदी सरकार राबित असलेल्या महत्त्वकांक्षी विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. नव्याने उपलब्ध होणारी घर ही महिलांच्या नावावर करून “चूल आणि मूल ” या सामाजिक चौकटीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी आता महिला ह्याच घर मालक बनतील. शिवाय मुलींचा जन्मदर वाढीसाठी सरकारकडून ” लेक लाडकी ” ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली. आपल्या भाषणात आमची ” भेगा पडलेली वज्रमूठ नव्हे, तर विकासाची मजबूत मूठ ” आहे असे सांगत त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला दरम्यान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य व केंद्र सरकार राबवीत असलेल्या आदिवासींसाठीच्या विविध योजनांची माहिती देत राज्यात भाजपची वाढत असलेली ताकद विरोधकांची धडधडी वाढविणारी असण्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर विदर्भातील व जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सदर संकल्प सभेस जिल्हाभरातून महिला व पुरुषांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यकर्ते व जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रवेश.
__ अनंतराव देशमुख
( माजी खासदार )
दरम्यान, प्रस्ताविकात बोलतांना अनंतराव देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या जनरल सेक्युरिटी पासून राजकारणाची सुरुवात केली. सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यानंतर मंत्री झालो मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावून काँग्रेससाठी खासदारकिची निवडणूक लढायला लावली. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने खासदार सुद्धा झालो, तरीपण पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने माझे तिकीट काटले तरीसुद्धा गेल्या चाळीस वर्षात ब्र शब्द न उच्चारता भरपूर सेवा केली. परंतु काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना आता किंमत नाही. पक्ष संघटनेसाठी खंबीर नेतृत्व काँग्रेसकडे नसल्यामुळेच, आपण दुर्लक्षित केल्या गेलो. खास कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सर्वांशी विचार्विर्मश करून, जन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी व माझे असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झालो आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यातून आपण रिसोड मतदार संघाचा विकास व जनसामान्यांची समस्या सोडविण्याचे काम भाजपच्या माध्यमातून करणार आहोत.