
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-नामदेव तौर
परतूर :भारतातील एकमेव देवस्थान असलेल्या भगवान पुरुषोत्तम मंदिरालगत असलेल्या गोळेगाव पुरुषोत्तमपुरी या दोन् गावातून गेलेल्या गोदावरी नदीवर पूल बांधण्यात येऊन गोळेगाव ते लोणी व गोळेगाव ते कुंभारवाडी येथून जाणाऱ्या शेगाव पंढरपूर या दिंडी मार्गाला पुरुषोत्तम मंदिर जोडण्यात यावे व तसेच गोळेगाव कडील गोदावरी पात्रात घाट बांधण्यात यावा यासाठी विभागीय आयुक्त यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
याविषयी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बिड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी ता माजलगाव या गावात गोदावरीच्या तिरावर भगवान पुरुषोत्तमाचे पुरातन मंदिर आहे भारतात एकमेव मंदिर असलेल्या या तिर्थक्षेत्रास हजारों भाविक दर्शनासाठी येत असतात आदिक मास मध्ये यास अधिक महत्व प्राप्त झालेले आहे,सदरील मंदिर गोदावरीच्या काठावर वसलेले असुन लोक आंघोळ करून दर्शनासाठी जात असताना मंदिराच्या बाजूने असलेल्या भागात आंघोळी करिता व्यवस्थित ठिकाण नसल्याने लोक नाईलाजाने गोळेगाव कडे नावे द्वारे जाऊन जीवघेणा प्रवास करतात मंदिराला जोडण्यासाठी गोदावरी नदीवर पूल गरजेचा असून मागे काही घटना घडल्या आहेत यामध्ये काही भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यु देखील झालेला आहे हि बाब लक्षात घ्यावी असेही निवेदनात नमूद केले आहे त्याचबरोबर या तिर्थक्षेत्राला दिंडी मार्गाला जोडण्यात यावे अशी मागणी केली असून गोळेगाव येथे शेकडो किलोमीटर अंतरावरून लोक दशक्रिया विधी करण्यासाठी येतात याकरिता गोळेगाव हद्दीत घाट निर्माण करण्याची मागणी सदरील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.भगवान पुरुषोत्तम मंदिर निर्माणसाठी 56 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याकामाचा आढावा घेण्यात आला, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर येथे सपत्नीक उपस्थित होते त्यांच्या सोबत बिडच्या जिल्हाधिकारी, माजलगाव मतदार संघाचे आमदार, उपविभागीय अधिकारी, यांच्या सह सर्व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.याप्रसंगी आयुक्त केंद्रेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले गोळेगावचे सरपंच प्र.उद्धव डोळस ,दादाभाऊ तौर, लक्ष्मीकांत पाटील हे यावेळी उपस्थित होते.