
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
१२ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ७:३० वाजता केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ व बेरोजगारी व महागाई विरोधात फुले- शाहू- आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने प्रेरित असलेल्या बहुजनांचा धडक मोर्चा गांधी चौक , आंबेडकर चौक ते जटपुरा गेट पर्यंत काढण्यात आला. जटपूरा गेट येथे मोर्चा चे रूपांतर सभेत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सुपुत्री असलेल्या युवा नेत्री शिवानी वडेट्टीवार, माजी नगरसेवक नंदू नागरकर, काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्या सौ.सुनिता लोढीया, शहर काॅंग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, राजेश अडुर, चंदा वैरागडे, शिवा राव, सचिन कत्याल, रमिज शेख, कुणाल चहारे ,स्वाती त्रिवेदी, शालिनी भगत आदि प्रमुख काँग्रेस पदाधिका-यांचा उपस्थितांमध्ये सहभाग होता.यावेळी बहुजन कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.