
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- शितल रमेश पंडोरे
——————————————————
छावणी परिषदेच्या हद्दीतीलव टोलनाके १२ एप्रिल २०२३ च्यारात्रीपासून बंद करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरातील पाच टोलनाके आता बंद होणार आहेत. संरक्षण विभागाने ११ एप्रिल २०२३ रोजी यासंबंधीची अधिसूचना जारी केली.छावणी परिसरात वेगवेगळ्या माध्यमातून वाहनांकडून विविध शुल्क वसूल केले जात होते. पथकरात वाहन प्रवेश कर आणि वाहन प्रवेश फी वसूल केली जात होती. वाहन प्रवेश फी २०२२ मध्ये बंद करण्यात आली होती. आता नवीन अधिसूचनेनुसार टॅक्स बंद होणार आहे. छावणी परिषदेचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते करणसिंग काकस यांनी हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचे म्हटले आहे. वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केले जात होते. कंत्राटदारावर कुठलाच वचक राहिला नव्हता. नागरिक आणि वाहनधारक यामुळे त्रस्त झाले होते.