
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
महामानव विश्वरत्न ,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडावर महिलांसाठी अनेक स्पर्धा घेऊन जसे की,रांगोळी लहान मुलांसाठी अनेक प्रकारच्या खेळाचे स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. त्यांचे बक्षीस वितरण सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दलित समाजामध्ये विशेष कार्य करणारे उद्योजक , शिवकुमार सोरटे, पन्हाळगडावर सर्वच महापुरुषांची जयंती साजरी करण्याचे परंपरा निर्माण करणारे, पन्हाळा फेरीवाले असोसिएशनचे सचिव ,शितलकुमार गवंडी यांचे सत्कार करण्यात आले. योगेश वराळे यांची प्राथमिक शिक्षण बँकेमध्ये संचालक म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. छोट्या बालकां नी मनोगत सादर केले त्यामध्ये प्रिन्स कांबळे,यावेळी भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष, श्रीकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बाबासाहेब हे एका कोणत्या समाजाचे नेते नसून ते संपूर्ण भारतातल्या सर्व समाजाचे नेते आहेत.यांची जयंती ही फक्त हॉलमध्ये न होता चौकात मोठ्या प्रमाणात व्हावी अशी त्यांनी आशा व्यक्त केली, काही लोकांकडून बाबासाहेबांना मर्यादित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पन्हाळा पोलीस निरीक्षक मा. श्रीमती स्नेहा गिरी मॅडम यांनी महिलांना शिका,संघटित व्हा व लढा द्या अशा प्रकारे मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते सतीश भारतवासी लाभले होते. ४,०० वा बाबासाहेबांची भव्य अशी गावातून मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमांचे नियोजन जे बी स्पोर्ट्स पन्हाळा यांच्याकडून करण्यात आले होते. अध्यक्ष सुरज कासे , उपाध्यक्ष पार्थ सोरटे, खजानिस ,शक्ती सोरटे, सचिव ,अक्षय सोरटे, सागर कांबळे, विशाल कांबळे, दादू कांबळे, यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ( तात्या ) राजू सोरटे, यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले होते,
यावेळी पन्हाळगडावरची प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक महिला, आजी-माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, चंद्रकांत गवंडी, सौ रूपालीताई रवींद्र धडेल, दिनकर भोपळे, नगरसेवक, चैतन्य भोसले, रवींद्र तोरसे, अमित पवार,अमरसिंह भोसले, संग्रामसिंह भोसले पत्रकार, शरद शेडगे, शहाबाज मुजावर, उपस्थित होते.