
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके- जगातील पहिला महामानव युगपुरुष समता युगाचे दीपस्तंभ बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न इतिहासकार बहुजनांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम 132 व्या जयंतीनिमित्त धनगर पिंपरी गावकरी चा वतीने मनापासून कोटी कोटी विनम्र अभिवादन.
महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म महू गाव मध्य प्रदेशामध्ये झालेला आहे. 14 एप्रिल 1891 ह्या महामानवाचा जन्म झाल्यामुळे हजार वर्षापासून गुलामगिरीच्या जंजिरामध्ये जपून बसलेला हा समाज, संपूर्ण भारतीय समाज, गुलामगिरी मध्ये जीवन जगत असताना, प्रथम रामजी सुभेदार बाबा यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन, महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिपूर्ण शिक्षण, करण्यावरच प्रथम भर दिला,. आणि महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिपूर्ण शिक्षण झाल्यानंतर, हजारो वर्षापासून गुलामीत असलेला समाज यास आपण मुक्त केले पाहिजे, असे बाबासाहेब आंबेडकरांना वाटू लागले, महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मोठमोठे आंदोलना करून, समाजाला समाज परिवर्तनाची दिशा देऊन,. शिका संघटित व्हा संघर्ष करा, असा मुख्य नारा देऊन, समाजाला शिकण्याच्या आव्हान केले,. समाज घराघरांमध्ये शिकू लागला, मोठमोठे अधिकारी पदाधिकारी निर्माण होऊ लागले,. परंतु समाज हितासाठी नसून फक्त स्वतःच्या स्वतः स्वार्थासाठी, निर्माण झाले, मात्र महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सापडले , संपूर्ण जीवन महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी, खर्च करून, भारतीय संविधान लिहून, संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाला समान संधी निर्माण करून, अधिकार देण्याचे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे याचे ठिकाणी मला सांगावेसे वाटते, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक भर ब्राह्मणांनी नाकारला होता. याचाच बदला म्हणून महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह करून, रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृति जाळण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा, राज्याभिषेक न केल्याचा, एका प्रकारचा भर ब्राह्मणांचा बदला घेण्याचं काम हा मानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, काळा राम मंदिराचे आंदोलन असेल, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल, येवल्याचे धर्मांतराची घोषणा असेल, मुखेड मधील सभा असेल, नागपूर दीक्षाभूमी येथील बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन, समाजाला बौद्धाच्या ओटी मध्ये टाकून एक सिंहनाद केल्याची घोषणा महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून, या भारत देशाला, दिशा देण्याचे काम केले आहे. या जगामध्ये एकही महामानव असा नाही. भारताच्या व्यतिरिक्त बाहेर दीडशे देशांमध्ये महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने याचा मला सार्थ अभिमान आहे. घराघरांमध्ये महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सणासुदीसारखी साजरी केल्या जात आहे. आणि प्रत्येकाच्या मर्जीने, मला तू साजरी केली जात आहे. याचा खरोखरच आम्हाला आनंद आहे. या जन्मातच काय? परंतु मी हजारो जन्म घेतले तरी, महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, उपकाराची फेड परत होणार नाही. असे मला दिसून येत असताना देखील, आम्ही महामानव परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावलावर चालण्याचा आणि प्रयत्न करीत आहे. महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आणि माझा रक्ताचा शेवटचा थेंब श्वास असेपर्यंत, महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी बांधील राहील, असे भाषणातून
मुलांनी दाखवून दिलं धनगर पिंपरी गावाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लहान लहान मुलांना अशी भाषणातून सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समोर
ठेवण्याचं काम ह्या लहान लहान मुलांनी केले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली
जयंती साजरी करता वेळेस सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य मुख्याध्यापक साहेब सर्व शिक्षक वृंदा शालेय समिती सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष व
गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पदाधिकारी या अशी सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली