
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड अंबाजोगाई– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस एक प्रमुख भारतीय सण व उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारता सह जगभरात साजरा केला जातो . अशीच एक आनोखी परंपरा अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांचे प्रेरणास्थान माननीय श्री भीमसेन आप्पा लोमटे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात 132 वी जयंती सर्व समाजातील जातीतील मित्र परिवारांना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री लंकेश वैद्य सर व युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री रमेश शिरसाट साहेब तसेच उद्योजक श्री गुलाब बोराडे साहेब तसेच दैनिक चालू वार्ता या पेपरचे जिल्हा प्रतिनिधी श्री बालाजी देशमुख हे होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमृतेश्वर मल्टीस्टेट निधी बँकेचे मॅनेजर श्री उमेश भाऊ जोगदंड यांनी केले श्री लंकेश वैद्य सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विषयी खूप छान मार्गदर्शन केले . श्री भीमसेन आप्पा लोमटे यांच्या नियोजनाखाली विशिष्ट तरुणांनी ही जयंती साजरी केल्याचे नियोजन केले याचा आम्हाला अभिमान वाटतो. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी बाबासाहेबांना स्वीकारले का हा प्रश्न उपस्थित केला व डॉ. आंबेडकर यांचा अंतिम उद्देश एकच होता परिवर्तन व जातीचा अंत झाला पाहिजे .तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी खूप छान विचार मांडले. यानंतर युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री शिरसाट साहेब यांनी मार्गदर्शन केले . की बाबासाहेबांना तमाम भारतीयांनी व सुशिक्षित लोकांनी स्वीकारले याचे जिवंत उदाहरण म्हणजे भीमसेन आप्पा लोमटे यांनी जयंतीचा ठेवलेला हा कार्यक्रम यांनी ही खूप छान मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी श्री भीमसेन आप्पा लोमटे यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले की हा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम आहे तो म्हणजे सर्व समाजातील जातीतील नवयुवक मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली व भविष्यात पण असे कार्यक्रम घेऊ असे त्यांनी ग्वाही दिली व नंतर सर्व प्रमुख पाहुणे व मित्र परिवार यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके देण्यात आली व त्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमसेन आप्पा लोमटे, बंडू वाघमारे, उमेश भाऊ जोगदंड ,योगेश जाधव सर ,गणेश सोळंके ,किशोर पाडोळे, ऋषी नरसिंगे, सुदर्शन धोत्रे ,मनोज कोकणे, श्रीकांत वाघमारे, महेश गंगणे ,अनिकेत आराध्ये, अजित भगत, पप्पू जगताप, सिद्धू जगताप ,धीरज लोमटे, अधिक कार्यकर्ते तसेच भीमसेन आप्पा लोमटे मित्र मंडळ मधील कार्यकर्ते उपस्थित होते