दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी
भूम:- शहरातील ज्ञानसागर इन्स्टिट्यूट येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त विशेष उपक्रम आरोग्य शिबिर यामध्ये रक्त, शुगर, बीपी, थायरॉईड तपासणी करण्यात आली.यावेळी आरोग्य कर्मचारी नवनाथ चव्हाण, पवन देवरे, अभिजीत साळुंखे यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित महिला संगीता शिंदे ,छाया बीटे, अश्विनी मुसळे, नूरजहा पठाण होते.कार्यक्रम यशस्वीरित्या होण्यासाठी आदर्श शिंदे, सोनम बनसोडे, किरण रेवडकर,आकाश ईटकर, अरशन पठाण, ज्ञानसागर इन्स्टिट्यूट चे विकास मिसाळ आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.