
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर प्रतिनिधी.
वाडा तालुका
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती वाडा यांच्याकडे खालील कामांचे निवेदन देवुन काम लवकरच सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
*वाडा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील वर्षानूवर्षे रस्ते न झाल्याने येथील ग्रामस्थांना रस्त्यांअभावी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात,संपुर्ण आदिवासी लोकवस्ती असलेल्या पाड्यांवर शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत रस्ते झालेले नाहीत , रुग्ण,विद्यार्थी,महिला,जेष्ठ नागरीक यांना पक्क्या रस्त्याअभावी खुप त्रास सहन करावा लागतो आहे,काही महिन्यांपुर्वी अनंता वनगा साहेब व कार्यकर्त्यांनी या आदिवासी गाव वस्त्यांची पहाणी करुन वस्तूस्थिती जाणून घेतली होती,आज रोजी पं. स. माजी सभापती योगेशजी गवा,पं.स. सदस्य सागरजी ठाकरे व उपअभियंता साहेब बांधकाम विभाग यांच्याशी सविस्तर चर्चा करुन उपअभियंता साहेबांना खालील कामांचे निवेदन देण्यात आले त्यावेळेस आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा साहेब व कार्यकर्ते उपस्थित होते
खालील मागणी करणेत आलेली गावांच्या रस्त्यांची नावे
*१) गारगाव मेन रोड ते डोंगरपाडा रस्ताची पाहणी करुन रस्ता तत्काळ करणे.*
*२) अंभरभुई ते बामणशेत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.*
*३)पिंपरोळी मोरेपाडा ते भगतपाडा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.*
*४) सारशी बस थांबा ते डोंगरशेत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.*
*५)उज्जैनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विरे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.*
*६)उज्जैनी ग्रामपंचायत अंतर्गत सातरोंडे ते काटीचापाडा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
सदर निवेदनात सुचवलेले रस्ते हे आदिवासी पाड्यांवरील आहेत खरोखर या भागात रस्त्यांची आवश्यकता आहे. तरी प्रशासनाने या पक्के रस्ते नसलेल्या गावांची पाहणी करुन तात्काळ उपाय योजना करावी.अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अशी माहिती अरुण खुलात (नगरसेवक) व पालघर जिल्हा अध्यक्ष-आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना. पालघर जिल्हा कमिटी यांनी दिली.