दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:अनेक महिन्यांपासून वाळू केंद्रांचा लिलाव होत नसल्याने वाळू तस्करांचे चांगभलं झालं आहे. सर्वसामान्यांना वाळू खरेदी करनं परवडत नाही मात्र, यात वाळू तस्करांचा फायदा होत असून, यंत्रणांना मॅनेज करण्यात दलालांचा बोलबाला झालाय.
वाळू अभावी शहरात व परिसरात मोठ्याप्रमाणात घरकुलाचे बांधकाम रखडली आहेत. याचाच फायदा वाळू तस्कर उठवत असून, महसुल व पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन वाळू तस्कर देगलूर तालुक्यातील तसेच तेलंगणातून अवैधरीत्या वाळू आणून ५ हजार ते ६ हजार ब्रासने विक्री करत आहेत. . वाळू परवडत नसल्याने अनेकांनी आपले बांधकाम सुरू केले नाही. तर काही नी बेभाव वाळू व सिलकोट खरेदी करुन बांधकाम सुरू केलं आहे. वाळू तस्करीचं नेटवर्क चालविण्यासाठी दलाल महत्वाची भुमिका आहे. अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ढिगभर तक्रारी आल्या तरीही महसुल यंत्रणा कुठलीही कारवाई करण्यास पुढाकार घेताना दिसत नाही. तर पोलिस यंत्रणाहीयाकडे डोळेझाक करत आहे. देगलूर मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी वाळू तस्करी बाबत विधानसभेत तारांकित प्रश्न लावून तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या चौकशीची मागणी केली होती मात्र आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन ही काही उपयोग झाला नसल्याचे सध्याच्या वाळू तस्करीवरुन दिसत आहे.
सध्या बिलोली तालुक्यातील येसगी व सगरोळी येथील मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक देगलूर मार्गे होत आहे. वाळूच्या ओव्हरलोड ट्रक, टिप्पर देगलूर तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या समोरून गाड्या जात असताना प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे. चालकांकडून वसुली तर केली जात आहेच मात्र, ट्रॅक्टर, मालवाहू करणाऱ्या मॅक्स पिकअप वाहनांकडून ही दरमहा हजारोंची वसुली केली जात आहे. महसूल यंत्रणेला दलालां मार्फत रसद पुरवठा केला जाते त्यामुळे वाळू तस्करांना कारवाईची कुठलीही भीती नाही.
दिवसरात्र वाळू तस्कर वाळूची वाहतूक करणाऱ्यांनी दलालांमार्फत यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी काहींना पाहिजे ती सर्व सुविधा पुढाकार घेताना दिसत नाही. तर पोलिस यंत्रणाही पुरवत असून काही अधिकाऱ्यांन ट्रॅपमध्ये अडकवून आपले मनसुबे साध्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, वाळू तस्करांनी आपली पोळी भाजून घेण्यासाठी महसुल आणि पोलिसमधील काहींना चांगलेच कव्हर केल्याचं सध्या चालू असलेल्या वाळू तस्करीवरुन दिसत आहे. महसूल अधिकाऱ्यांनी देगलूर तालुक्यामधील वाळू तस्करांना आणि दलालांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देगलूर शहरातील नागरिकांतून केली जात आहे.