दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
यावर्षीचे कार्तिकी फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.
खा श्री.संजय हरीभाऊ जाधव,
पत्रकारश्री गणेश खंडेराव पांडे,
डॉ. श्री.संजय साहेबराव कदम,
श्री. बिभीषण विठ्ठल मुंगूसकर,
श्री.संजय सटवाजी कॉलगणे,
संपूर्ण महाराष्ट्राचे व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी मराठवाड्यातून रेल्वे प्रशासनाने मीटर गेटचे रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झाल्यानंतर मागील अकरा वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या निजामाबाद पंढरपूर या रेल्वेचा दरवर्षी वर्धापन दिन तालुक्यातील पांगरा ढोणे येथील व कार्तिकी फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ही परंपरा कायम ठेवत याही वर्षी 1७ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता पूर्णा रेल्वे टेशनवर निजामाबाद – पंढरपुर गाडीचा वर्धापन दिन टाळ मृदंगाच्या गजरात व शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भजन करत साजरा करण्यात येणार आहे व तसेच रेल्वे इंजिन फुलाने सजवुन चालक व गार्ड स्टेशन मास्तर यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम सदाशिव ढोणे यांनी दिली आहे.ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या या लोहमार्गावर मराठवाड्यातील प्रवाशांसाठी दक्षिण मध्ये रेल्वेने निजामाबाद पंढरपुर ही गाडी रेल्वे अकरा वर्षांपूर्वी सुरू केली या गाडीला नांदेड. पुर्णा.परभणी .परळी. लातूर. उस्मानाबाद. कुरूडवाडी. बार्शी .या मार्गे हजारो भाविकांनी प्रतिसाद दिला त्यामुळे कार्तिकी फाउंडेशनच्या वतीने गाडीचा वाढदिवस साजरा केला जातो दरवर्षी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यकतीचा गौरव केला जातो यावर्षी या गाडीच्या वर्धापनदिनी निमित्त 19 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील महाद्वार नामदेव पायरीच्या जवळ निलाबाईच्या वाड्यामध्ये वारकरी कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित केलेल्या त्यांचा दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता भागवताचार्य वेदशास्त्र संपन्न ह.भ.प.दीपक गुरु महाराज पांगरेकर यांच्या हरिकीर्तनामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचे मानकरी
परभणीचे खासदार वारकरी संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव .तसेच सकाळचे जिल्हा प्रतिनिधी श्री. गणेश खंडेराव पांडे .तसेच डॉ श्री संजय साहेबराव कदम ,श्री बिबीशन विठ्ठल मुंगुसकर ,श्री संजय सटवाजी कोलगणे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी १८.१९ एप्रिल रोजी ह.भ.प. अंगद महाराज माहेरकर.ह.भ.प.बबन महाराज मुडीकर.ह.भ.प.राम महाराज सुगावकर.
ह.भ.प.गुलाब महाराज निळेकर.ह.भ.प.भगवान गुरुजी ढोणे पांगरेकर. यांचे हरी किर्तन होनार आहे. नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या कीर्तन श्रर्वनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पांगरा ढोणे ग्रामथांनी केले आहे