दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: तालुक्यातील पांढुर्णा या आदिवासी बहुल गावात भिमालपेन उत्सव साजरा करण्यात आला त्यात आदिवासी संस्कृतीनुसार गाव म्हटल की आपले पेन आपल्याचं गावात असतात पण ओळख नसते.आता या पेनाची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक गावा-गावात हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प आदिवासी बांधवांना करण्यात आले पेनशक्ती आपली रक्षा करते अशी आदिवासी बांधवांची श्रद्धा आहे त्यानुसार
१२ एप्रिल रोजी पांढुर्णा येथील तिरू.सुरेश मडावी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता शेतात.दयतोबा,आसरा,
भिमालपेन व वाघोबा आहे.या पेनाची वाजतगाजत गोगो करण्यात आली.भाव सुद्धा देण्यात आला.या कार्यक्रमात सगासोयरे उपस्थित होते.गोंडी भजन म्हणण्यात आले.
पेन आपल्याच घरी आपल्याच परिसरात आहे.हे आम्हाला पहायला मिळाले.सुरूवात ही आपल्याच घरातून व गावातून व्हायलाचं पाहिजेत असे स्पष्ट मत नरेश मडावी यांनी मांडले